
‘ एलसीबीची ‘कारवाई! अंडेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांना पकडले!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधि
उषा इंगळे बुलढाणापोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशान्वये व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात ‘ ‘ ‘एलसीबी ने ‘बेकायदा व्यवसायाविरुद्ध रणसिंग फुंकले आहे. गेल्या दोन दिवसात पथकाने विविध ठिकाणी धाडसत्र राबवून रेती तस्करी, गांजा विक्री, वरली मटका देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. तसेच त्यांच्या ताब्यातून तब्बल ३२ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध धंद्याची स्तोम मोठ्या प्रमाणात माजले आहे. सध्या गणपती उत्सव सुरू असून उद्या जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणूक आहे. या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीच अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक सुनील कडासने अवैध धंदेविरुद्ध कडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वा स्थागुशाच्या पथकांनी विविध ठिकाणी छापेमारी केली.अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत टाकलेल्या छाप्यात अवैध उपसा करणाऱ्या आरोपींसह उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक बोट (किंमत४ लाख रुपये), अशोक लेलंड कंपनीचे टिप्पर (किंमत २५ लाख रुपये), ३ ब्रास बिना रॉयल्टी वाळू (किंमत ३० हजार रुपये) तसेच १ लाख २१ हजार रुपयांचे साहित्य, असे एकूण ३१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला पाच आरोपींविरुद्ध भादंवीचे कलम३७९,३४ सहकलम २१(१),२१(२) गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरातील इकबाल चौक व मच्छी मार्केट परिसरात सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर धाड २(ब) एन .डी .पि. एस. ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २६ सप्टेंबर रोजी चिखली शहरातील रोहिदास नगर मध्ये टाकलेल्या धाडित आरोपी राहुल अजबराव कारले(वय ३३ वर्षे) यांच्या ताब्यातून अवैध देशी दारूसह ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून कारवाई करण्यात आली. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या अंमलदार लेकुरवाळे, गिरी, हॅलोडे, मेहेर ,अंभोरे, राजपूत ,पाटील, दराडे, राठोड, शेळके ,बोचे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे यांचा सहभाग होता.



