आजाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी सुजित बांगर यांची निवड….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २९ जून २०२६
दि.29 जून 2026 रोजी आजाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ऍंड.चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील सुजित बांगर यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सुजित बांगर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून एससी,एसटी,ओबीसी आणि मायनॉरिटी समूहातील शोषित,वंचित,पीडित,शेतकरी,शेतमजूर,महिला,विद्यार्थी-विद्यार्थिनी,युवक व सर्वसामान्य जनतेच्या विविध जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या संघटन विस्ताराला गती मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुजित बांगर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यातील वरिष्ठ नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले.
“पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, सर्व घटकतील लोकांना व युवकांना संघटनेशी सन्मानपूर्वक जोडणे आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी कटिबद्ध राहणार” असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या नेतृत्वासह कार्यकर्त्यांनी सुजित बांगर यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील त्यांच्या चहात्यांमध्ये आनंदाचे व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.



