मराठा आरक्षणाच्या आंदोलन लढ्यास जाहीर पाठिंबा – आमदार आकाश फुंडकर

मराठा आरक्षणाच्या आंदोलन लढ्यास जाहीर पाठिंबा – आमदार आकाश फुंडकर
*अंतरवाली सराटे येथे काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी, त्या घटनेचा जाहीर निषेध
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
*एस. आय टी नेमुन चौकशी करून दोषीवर कारवाई मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री करणारच आमदार आकाश फुंडकर.
राज्यातील सराटे अंतरवाली येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनात लाठी चार्ज केल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये दोषीवर एस आय टी मार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री ना श्री एकनाथजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबीत असून ४० वर्षाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. हे मराठा समाजाचे दुर्दैव असून, सन 2014-19 मध्ये भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विराट महामोर्चे मराठा समाजाच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध व शांतपणे काढण्यात आले. समाजाच्या भावना लक्षात घेऊन. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. सदरचे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. सर्वोच्च न्यायालयात फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या पहिल्या सुनावणीतही मराठा आरक्षण कायम ठेवण्यात आले होते.
नंतरच्या काळात सरकार बदलले उद्धव ठाकरे आणि शरद पवार व काँग्रेसच्या महाआघाडी सरकारने आरक्षणाच्या या मुद्द्याकडे लक्ष न दिल्यामुळे, मराठा समाजाला बहाल झालेले आरक्षण टिकवता आले नाही, दरम्यानच्या काळामध्ये मराठा आंदोलने ही झाली मात्र त्या सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले, अडीच वर्ष सत्तेत असतांना मराठा आरक्षणाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा मराठा आरक्षण मिळण्याबाबत उध्दव ठाकरेंनी ना शरद पवार यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही.
गेल्या कित्येक वर्षापासूनचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयात असून, समाजाच्या भावनाचा मी आदर करीत आलेलो आहे. मराठा समाजाच्या महामोर्चामध्ये मी सक्रीय सहभाग देखील घेतला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे या मागण्यांबाबत सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे एकमत आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यातील आंदोलनाबाबत सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्रात मराठा समाज हा अतिशय शूर वीर चारित्र्यसंपन्न आणि देशभक्त समाज आहे या पार्श्वभूमीवर कोणीही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या लढ्याला माझा व माझया पक्षाचा पाठिंबा असल्याचे प्रसिद्धीस दिलेले पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
राज्यातील भाजपा शिवसेना राकाँ महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देणार असा विश्वास त्यानी व्यक्त करून घटनेच्या दिवशी दोषी व्यक्तीवर कारवाई होणारच त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही राज्याचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला न्याय देणार व समाजाला अपेक्षित न्याय देण्यासाठी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध असून समाज बांधवांनी शांततापूर्ण आंदोलन करावे. मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल जगभर पसरली होती शांततापूर्ण मोर्चा काढून मराठा समाजाने एक जगाला एक नवीन आदर्श दाखवली आहे हा इतिहास असून समाजाला न्याय देण्यासाठी योग्य ती पावले उचलणार असा विश्वास आमदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.
केवळ भाजपा शिवसेना राकॉ महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूने प्रयत्न सुरू आहे, ते यशस्वी होणार नाही. मराठा समाज संयमशीर व सर्वांना सोबत घेऊन 18 पगड जातीचा सन्मान, व बारा बलुतदार सोबत घेऊन ग्रामीण व शहरी भागात राहत असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्याला शासन प्राथमिकता देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाज कायदा व सुव्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून व आंदोलनाला योग्य दिशेला नेऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणालाही करु देणार नाही, असाही विश्वास आमदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.




