खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

महामार्गावर ट्रक उलटला दोन ठार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जळगाव प्रतिनिधी प्रमोद सौंदडे

| २६ मार्च २०२४ मुक्ताईनगर शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक उलटून चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली होती. परंतू २५ मार्च सोमवार रोजी चालक आणि क्लीनर यांचा अखेर मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर मलकापूर रोडवरील हॉटेल तिरंगाच्या जवळ रात्री अकराच्या सुमारास सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक (GJ03 AZ6339) अचानक उलटला. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लीनर हे दोन्ही ट्रकच्या खाली दाबले गेले असून यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या दोन्ही जणांना ट्रकखालून काढून रूग्णालयात दाखल केले. परंतू दोन्ही जणांचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे. रात्री उशीरापर्यंत याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्याचे काम सुरू होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button