खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानेश डोसेचे यश; शेगाव तालुक्यात प्रथम….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-

शेगाव:- ११ ऑगस्ट २०२६
बुलढाणा जिल्हा शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक शेगाव तालुक्यात प्रथम मेरिट मिळविण्याचा मान.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी २०२६ मध्ये शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थी ज्ञानेश भास्कर डोसे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ज्ञानेशने बुलढाणा जिल्हा शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक पटकावला असून, शेगाव तालुक्यातून प्रथम मेरिट मिळविण्याचा मान त्याने मिळविला आहे.
ज्ञानेश भास्कर डोसे याच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याचे पालक, शिक्षक तसेच शेगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत कमी वयात शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश त्याच्या मेहनतीची, अभ्यासातील सातत्याची आणि गुणवत्तेची साक्ष देणारे ठरले आहे. ज्ञानेशने अभ्यासात सातत्य ठेवत शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग केला. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी केलेली मेहनत, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. बुलढाणा जिल्हा शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक आणि शेगाव तालुक्यात प्रथम मेरिट मिळविणे ही त्याच्यासाठी तसेच त्याच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.
या यशाबद्दल संग्रामपूर पंचायत समितीचे शिक्षक पतसंस्थेचे पदाधिकारी श्री. भास्कर डोसे सर यांनी ज्ञानेशचे कौतुक करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शेगाव यांनीही ज्ञानेशच्या यशाचे अभिनंदन केले.
ज्ञानेशच्या या यशामुळे माऊली स्कूल ऑफ स्कॉलर, शेगावच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, ज्ञानेशने भविष्यातही अशीच उज्ज्वल शैक्षणिक कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत……!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button