मुख्याध्यापिकेने केले 8 वर्षीय विद्यार्थ्यांची चड्डी सोडली अन् अन केले हे कृत्य

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील जि.प. मराठी प्राथमीक शाळेत केळी वाटप करण्यात आली, मात्र एका विद्यार्थ्याला
काळी पडलेली निकृष्ट केळी देण्यात आली, याबाबत विद्यार्थ्याच्या पालकाने मुख्याध्यापिकेला जाब विचारला याचा राग मनात धरून सदर मुख्याध्यापिकेने वय ८ बर्ष या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याची लाजीरवाणी घटना २१ मार्च रोजी घडली.
हकीकत अशाप्रकारे आहे की, विद्यार्थी वय ८ वर्षे हा जि. प. मराठी प्राथमीक शाळामध्ये शिकत असून आरोपी ही सदर शाळेची मुख्याध्यापीका आहे. १५ मार्च रोजी शाळेत मुलांना केळी वाटण्यात आली. फिर्यादी यांनी आरोपी हीस काळी पडलेली केळी का वाटप केली याबाबत विचारणा केली, असता आरोपी, हिने केळी चांगलीच आहेत असे म्हणून वाद घातला होता. यानंतर जि.प. मराठी माध्यमिक शाळा येथे आरोपी हीने यातील फिर्यादीचा
मुलगा पिडीत वय ८ वर्षे याला वर्ग खोलीत ‘तुझ्या बापाला कंम्पलेंट करायले लावतो काय, माझी बदली करायला लावतो काय,’ असे म्हणून त्याच्यासोबत लैंगिक छळ केला व ‘थांब तुला आता दाखवते.’ असे म्हटले. त्यावेळी पिडीत हा पळत निघाल्याने शाळेत पडला व त्याचे पायाला मार लागला आहे.
याप्रकरणी विद्यार्थ्यांचे वडील रा. जवळा बु. ता. शेगांव यांनी २१ मार्च रोजी शेगांव ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिल्यावरून पोलीसांनी आरोपी मुख्याध्यापीका जि.प. मराठी प्राथमीक शाळा जवळा बु. (रा. अकोला) यांचेविरूध्द अप नं. ९४/२०२४ कलम ३२३,५०६ भा.द.वि. सहकलम ८, १० बालकांचे लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधि, सहकलम ३(१) (आर), ३(२), (व्ही.ए.) अ. जा.ज.अ. प्र. कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी खामगावं हे करीत आहेत. (श.प्र.



