अपघातबुलढाणामहाराष्ट्र

सणासुदीच्या दिवशी “पिता -पुत्रावर “काळाचा घाला! कारची दुचाकी ला समोरासमोर धडक; पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर.. हातडी खुर्द शिवारातील घटना.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा): पिता पुत्र शेतातील कामे आटपून तुम्ही घरी जात असताना अचानक कारणे समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज २४ मार्च, रविवार दुपारी १२ :३० वाजेच्या सुमारास हातडी खुर्द
शिवारात ही घटना घडली.
शिवाजी म्हातारजी चव्हाण (५५ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विशाल शिवाजी चव्हाण (२८ वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे बापलेक केसापूर येथील शेतातील काम आटोपून घरी माळ विहीर कडे निघाले होते. मात्र मध्येच अल्टो कंपनीच्या चार चाकी वाहनाने हातडी खुर्द शिवारात त्यांना समोरासमोर धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मूर्तक शिवाजी चव्हाण यांचे शव विच्छेदनाचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवगृहात सुरू आहे. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे हलवण्यात आली आहे. तर अल्ट्रोचालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर) यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button