सिंदखेडराजा तालुक्यात वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सुपरहिट!गावोगावी जंगी स्वागत! जांभोरा, चांगेफळ, रूम्हणा, धानोराच्या सभा गाजल्या!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
(सिंदखेड राजा):१० फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून निघालेले वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सध्या सिनखेडराजा तालुक्यात आहे. गावागावांत या यात्रेला भरभक्कम प्रतिसाद मिळत असून संदीप शेळके यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत चालली २३ मार्चला सिंदखेडराजा तालुक्यातील उगला, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, शेगाव राऊत, किनगाव राजा, जांभोरा, वर्दडी, बुट्टा तांडा, धानोरा चांगेफळ, रूम्हणा या गावांत संदीप शेळके यांची परिवर्तन रथयात्रा सुपरहिट ठरली. गावोगावी या यात्रेचे जंगी स्वागत झाले. प्रत्येक गावात संदीप शेळके यांनी विकासाचे व्हिजन मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. जांभोरा, चांगे फळ रूम्हणा , वडाळी या गावात
झालेल्या सभा तुफान गाजल्या.
यावेळी बोलतांना संदीप शेळकेंनी विद्यमान खासदारांवर जोरदार हल्ला चढवला.१५ वर्षात विकासाचा बट्ट्याबोळ केला.
संदीप शेळकेंनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले पुण्या-मुंबईकडे गेल्यावर तिकडचे लोक बुलढाण्याचे नाव घेतल्यावर अचंबित पणे पाहतात, कुठे आहे बुलढाणा विचारतात. मग त्यांना संतनगरी शेगाव किंवा मातृत्व सिंदखेडराजा, लोणार सांगावे लागते. एवढी मागास परिस्थिती
बुलढाणा जिल्ह्याची विकासाच्या बाबतीत वाट लावली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची संधी मतदारांना निर्माण झाली आहे. ते असूनही विकासाच्या नावाने भूलथापा मारतील, वेगवेगळी आश्वासने देतील पण त्याला बळी पडू नका. आता जनतेची दाखवून द्या, विकासासाठी वन बुलढाणा मिशनच्या चळवळीला साथ द्या असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.
त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचे संदीप शेळके सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाव वाढीसाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना २४ तास वीज आणि पाणी, पांधन रस्त्याची सुविधा यासह शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.



