खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

पोलिसांनी केल्या दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी पवार

| २४ मार्च २०२४पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे पाचोरा पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली आहे. माञ पाचोरा शहरात सर्रासपणे टपरी आणि हातगाड्यांवर विक्री होणाऱ्या दारु आणि चक्रीवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या पथकात पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. कॉ. विश्वास देशमुख, पो. कॉ. योगेश अरुण पाटील, पो. कॉ. योगेश सुरेश पाटील, होमगार्ड किशोर जगताप, कपिल पाटील कल्पना निंबाळकर, सोनाली पाटील या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी अवैधरित्या सुरु असलेल्या दोन गावठी दारु हातभदूया उद्धवस्त केल्या असून ३१ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी मल्हारी कोळी (वय ५३, रा. अंतुर्ली, ता. भडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे. या धडक कारवाई मुळे परिसरातील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु पाडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button