गुन्हेगारीमहाराष्ट्र

एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या युवकाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी रणधीर पवार

एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या युवकाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद..चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाचा हददीत फॉरेस्ट नाक्याजवळ (चेकपास्ट) जवळ मध्यप्रदेशातून एक संशयित गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसासह येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. 23 रोजी 10 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी रोहित दिवाकर वाघमारे (वय 24, रा. माळी चिचोरे, ता. नेवासा, ता. अहमदनगर) याची अधिक चौकशी करत झाडाझडती घेतली त्याच्याजवळून 25 हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटी कटटा (पिस्टल), 3 हजार रुपये किंमटीच्या पिवळ्या धातुचे 3 काडतुस (राउड) तसेच एमएच 17डीए 9191नंबरची दीड लाख किंमतीची रॉयल इंन्फील्ड कंपनीची बुलेट, असा एकूण 1 लाख 79 रुपयाचा हस्तगत करण्यात आला. सदरील इसमा विरुद्ध पो.कॉ. पवन ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ राकेश पाटील हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button