भुसावळ बाजार पेठ पोलिसांची कामगिरी

_भुसावळ_ प्रतिनीधी , पेट्रस सिरसाठ
भुसावळ नगर परिषद विविध झोन मध्ये व्यावसायिक मालमत्ता धारकांना भेटी देण्यात आल्या असून त्यापैकी
वसंत टॉकीज 43,00,000/- लक्ष कर थकीत असल्यामुळे सदर टॉकीज ला सील करण्याची कार्यवाही करणेत आली.
तसेच विविध व्यावसायिक मालमत्ता धारकांनी वसुली मोहिमेचा धडाका भरला असल्याने धनादेश तसेच रोख रक्कम न प कडे भरणा करीत आहे.
शहरातील संपूर्ण मालमत्ता धारकांनी मालमत्तेचा भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे याबद्दल मा. जितेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक तसेच मा. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या द्वारे करण्यात आले.
सदर मालमत्ता मोहिमेमध्ये खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
कार्यालय अधीक्षक शेख परवेज, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, अनिल आहुजा कर व प्रशासकीय अधिकारी, डॉ. रोहन राठोड कर प्रशासकीय अधिकारी, विष्णू राठोड कर व प्रशासकीय अधिकारी, वसंत राठोड SI, तसेच इतर झोन प्रमुख व प्रभागातील कर्माचारी उपस्थीत होते.



