महाराष्ट्रसामाजिक

रास्त भाव दुकान परवान्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध…

रास्त भाव दुकान परवान्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध… खामगाव जी डी रोकडे प्रतिनिधी खामगाव.. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने रास्त भाव दुकाने परवाना मंजूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून संबंधित गावात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन रास्त भाव दुकान परवाने प्रथम नुसार मंजूर करण्यात येणार आहेत यात पंचायत मध्ये ग्रामपंचायत व तस्तम स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत सेम सहायता बचत गट नोंदणीकृत सहकारी संस्था महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था महिला स्वयंसहायता बचत गट महिलांच्या सरकारी संस्थांचा समावेश असेल. बुलढाणा तालुक्यातील दत्तपुर, चिखली तालुक्यातील अमडापूर, सावरखेड बु, वाघापूर, सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी, बाळ समुद्र, देऊळगाव राजा तालुक्यात दिग्रस, बू, मेहकर तालुक्यातील वडाळी ,नानज ,मोताळा तालुक्यातील चिंचखेड खुर्द, डिडोळा खुर्द, शेगाव तालुक्यातील महागाव, नांदुरा तालुक्यातील दहिवडी, अंबाडा इतर तालुक्यांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button