शेगाव बस स्थानकातून अण्णाभाऊ साठे यांचा फोटो काढण्याचे प्रकरण.. मातंग समाज शेगाव पोलीस स्टेशन मध्येआक्रमक;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा येथील बस स्थानकातील प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीवरील फोटो काढून टाकल्याच्या कारणावरून मातंग समाजबांधव आक्रमक झाल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. याप्रकरणी आगारप्रमुखावर पोलीस कारवाई व्हावी, या मागणीसाठी सोमवारी सांयकाळी मातंग समाजाच्या शेकडो नागरिकांनी शहर पोलीस स्टेशन गातून ठाणेदार हेमंत ठाकरे यांची भेट घेतली व आगारप्रमुखाविरूध्द लेखी तक्रार दाखल केली.
काही समाजकंटकांनी
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा फोटो काढून टाकला होता. ही बाब मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते आशिष सावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी मातंग समाज बांधवासह बस स्थानकाचे आगारप्रमुख यांना जाब विचारला, मात्र आगारप्रमुखांनी
फोटो कुणी काढला याबाबत
समाधानकारक उत्तर न दिल्याने मातंग
समाजबांधव आक्रमक झाले व ५ फेब्रुवारी
रोजी सायंकाळी शहर पो.स्टे. गातून
ठाणेदार हेमंत ठाकरे यांची भेट घेऊन
आगारप्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची
मागणी केली. तसेच त्याकरिता
आगारप्रमुखाविरुध्द लेखी तक्रारही दिली. यावेळी उपस्थितांनी नारेबाजीही केली तर नवनियुक्त ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी जमावाला शांत करीत कारवाईचे आश्वासन दिल्याचे समजते, उपरोक्त प्रसंगी जमावाचे नेतृत्व आशिष सावळे हे करतांना दिसले
याबाबत सविस्तर असे की, येथील बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीवर मागील अनेक वर्षांपासून महामानवांचे फोटो लावलेले आहेत.



