विदर्भसामाजिक

‘मुख्यकार्यकारी अधिकारी बुलडाणा यांना कालवड फाटा ता.शेगांव ते रोटी, दादगांव मार्गे निमगांव ता.नांदुरा या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी- मनसेची मागणी’

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

नांदुरा: कालवड फाटा ता. शेगांव ते भोटा ता. नांदुरा इतर जिल्हा मार्ग ५४, भोटा ते रोटी ग्रामीण मार्ग २, रोटी ते दादगांव ग्रामीण मार्ग १, दादगांव ते निमगाव ग्रामीण मार्ग ३, ग्रामीण मार्ग ९ हा सुमारे १३ किलोमीटर पर्यंतचा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असून सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दर्जोन्नती करणे आवश्यक आहे. कारण सदर रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पुरेसा निधीच नसतो व त्यामुळे कठोरा ता. शेगांव,कालवड ता.शेगांव माहुली ता.जळगांव जामोद,या तालुक्यातील गावातील नागरिकांना, तसेच नांदुरा तालुक्यातील हिंगणा (भोटा), भोटा,रोटी,दादगांव, हिंगणा इसापूर येथील नागरिकांना,आजारी व्यक्तींना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना, तसेच शेतकर्यांना आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा येथे न्यावा लागतो, या व्यतिरिक्त शासकीय- निमशासकीय कामानिमित्त नांदुरा येथे येथील नागरिकांना दररोज ये-जा करावी लागते. तसेच सदर रस्ता हा दोन ते तिन तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा प्रमुख रस्ता आहे. तसेच येथील नागरिकांची प्रमुख बाजारपेठ ही नांदुराच आहे,परंतू सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने व जिल्हा परिषद बांधकाम विभागांमध्ये निधी पुरेसा नसल्याने सदर रस्ता सुस्थितीत नाही.त्यामुळे सदर रस्त्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचा “प्रमुख जिल्हा मार्ग” म्हणून दर्जा वाढविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेचे उप जिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button