तेल्हारा येथे आज होणार भव्य दिव्य हळदी – कुंकवाचा सोहळा! ,शहरात प्रथमच सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर यांचे आगमन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा : दि.०५; तेल्हारा शहरात लोकजागर मंचचे तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांनी आज सोमवार दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी तेल्हारा शहरातील महिलांसाठी भव्य दिव्य असा हळदी कुंकवाचा सोहळा भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे करण्याचे योजीले असुन यानिमित्ताने शहरात प्रथमच सुप्रसिद्ध अभिनेते क्रांतीनाना मळेगांवकर यांचे आगमन होणार आहे .
सुप्रसिद्ध अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे सासू-सुनेच्या नात्यावर मनोरंजन करणार आहे तसेच काही हास्य ऊखाणे,विनोद , प्रश्नोत्तरे घेणार व अचूक उत्तरे देणाऱ्या महिलांना बक्षीस म्हणून पैठणीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तूचे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणीत करणारा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठरणार आहे! तरी शहरातील महिलांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांनी केले आहे.



