‘बुलडाण्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्या’

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील काही अधिका यांची बदली करण्यात आली आहे. यात एकूण 21 अधिका यांचा समावेश असून बुलडाणा जिल्ह्यातील 5 तहसीलदार बुलडाणा जिल्ह्यातून स्थानांतरित करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या उपसचिव अजित देशमुख यांच्या शासकीय आदेशानुसार बुलडाण्याचे तहसीलदार रुपेश खंदारे यांच्या जागी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या ठिकाणाहून व्ही एस कुमरे बुलढाणा तहसीलदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. खंदारे 4 ऑक्टोबर 2020 रोजी बुलडाणा तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. तर चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांची अकोला तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कव्हळे यांच्या जागी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील संतोष काकडे चिखलीचे तहसीलदार म्हणून पदभार सांभाळतील. तिसरी बदली मलकापूर येथील तहसीलदार आर. यू. सुरडकर सुरडकर यांची झाली आहे. त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी पाठवण्यात आले असून बाळापूर येथील तहसीलदार आर एम तायडे मलकापूरचे नवे तहसीलदार असणार आहेत. शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या ठिकाणी पदभार घेतील तर त्यांच्या जागी बार्शीटाकळी येथून आलेले डी. आर. बाजड शेगावची सूत्रे सांभाळतील. संग्रामपूर येथील तहसीलदार योगेश्वर टोपे वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. आर्णी यवतमाळचे तहसीलदार पी. झेड. भोसले संग्रामपूरचे नवे तहसीलदार म्हणून रुजू होणार आहे.



