महाराष्ट्रसामाजिक

शाश्‍वत विकासाचा दृष्टीकोन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – रणधीर पवार
मेक इन इंडिया, स्टार्टअप यासारख्या संकल्पनांच्या माध्यमातून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्‍चर, आरोग्य, इंडस्ट्रीयल, शेतकरी, महिला वर्ग, युवापिढी ह्या घटकांच्या विकासासाठी महत्वाच्या आणि मोठ्या तरतूदी मांडण्यात आल्या आहेत. देशात १५ नवी एम्स रुग्णालये तयार केली जाणार आहेत. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना जनतेच्या हितासाठी केल्या. सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे. आत्मनिर्भर भारताकडे दीर्घ पावले टाकण्यात आली असून अमृत काळाचा भक्कम पाया रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. २०१४ साली स्वातंत्र्य दिनी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात भारतीय ‘महिला आणि शौचालय’ यांचे दु:ख, आता 10.5 कोटी शौचालयांच्या माध्यमातून साकार होऊन ग्रामीण भागातील महिला वर्गाचा मानसिक आणि शारीरिक त्रास संपुष्टात येत आहे. शाश्‍वत विकासाचा दृष्टीकोन असलेला हा अर्थसंकल्प आहे.

  • डॉ. केतकी पाटील
    प्रदेश उपाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button