महाराष्ट्रसामाजिक

२०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प भारत पूर्ण करेल”; डॉ. उल्हास पाटील यांना विश्वास

विकसित भारताचे प्रतिबिंब
सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्‍वास हे ब्रीद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब दिसून येते. देशात इन्फ्रास्ट्रक्‍चर वाढीस लागण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी देखिल या अर्थसंकल्पात घेण्यात आली असून संरक्षण क्षेत्रासाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशात सात ठिकाणी आयआयएम या उच्च शिक्षण देणार्‍या संस्था मोदी सरकारने स्थापित केल्या आहे. देशातील २५ कोटी जनता ही दारिद्ररेषेबाहेर आली आहे. कनेक्टीव्हिटी वाढण्यासाठी देशभरात विमानतळांचे जाळे उभारले जात आहे. देशात १४९ नवीन विमानतळ विकसित करण्यात आले आहे. यंदा करप्रणाली जैसे थेच ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. परफॉर्म, रिफार्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या सुत्राच्या आधारे २०४७ पर्यंत देश विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.

  • डॉ. उल्हास पाटील
    माजी खासदार,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button