बुलढाणाराजकीयसामाजिक

बूथ कमिटीचे सदस्य करणार संदीप शेळकेंचा मार्ग सुकर ! फेब्रुवारीला बुलढाण्यात बूथ कमिटी मेळावा;१२ हजार “विजय दूत”एकत्रित येऊन करणारविजयाचे प्लॅनिंग…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा) निवडणुक पूर्वक तयारीत राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीचे संकल्पक संदीप शेळके यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. आतापर्यंत सहाही विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत त्यांनी राजीनामा जनतेचा या अभिनयाना अंतर्गत संवाद मेळावे घेतलेत. आता येत्या ३ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. बुलढाण्यात बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा होणार आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी असून हा मेळावा संदीप शेळके यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मदतीचा ठरणार आहे.
३ फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील साईकृपा लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. आधी वन बुलढाणा मिशनचे घेतलेला बूथ बांधणी मिळावा सुद्धा चांगलाच राजकीय चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान वन बुलढाणा मिशनने आतापर्यंत १२ ०० पेक्षा अधिक बूथ ची बांधणी पूर्ण केली आहे, उर्वरित बूथ बांधणी देखील पुढच्या काही दिवसांत पूर्ण होणार ३ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यात प्रत्येक बूथ प्रमुख व कमिटी सदस्य सहभागी होणार १२०० हजार विजयदुत या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे कोण बुलढाणा मिशनच्या प्रसिद्धी विभागाने कळवले आहे.

विजयाचे प्लॅनिंग…

गाव तिथे बूथ कमिटी असे पक्के नियोजन वन बुलढाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे. एकीकडे इतर इच्छुक उमेदवारी उमेदवारी मिळेल की नाही या संभ्रमात असताना संदीप शेळके यांची तयारी मात्र अतिशय जोरात पण तेवढेच सूक्ष्म नियोजन करून सुरू आहे. अर्थातच या तयारीचा फायदा संदीप शेळके यांना लोकसभा निवडणुकीत होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button