विदर्भसामाजिक

खेळ पैठणीचा कार्यक्रमाची जय्यत तयारी! संदीप शेळके यांनी घेतला तयारीचा आढावा; सिने अभिनेते क्रांती नाना माळेगावकर बुलढाण्यात पोहोचले!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

“न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा”या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला थोड्याच वेळात, सायंकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. बुलढाण्यातील शारदा ज्ञानपीठाच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम होत आहे. राजश्री शाहू मल्टीस्टेट स तसेच धनिक अँडव्हायझर्स यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ६ वाजता बुलढाण्यातील शारदा ज्ञानपीठचे प्रांगणात महिलांसाठी हा आनंददायी कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम खास महिलांसाठी असतो. सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत”न्यू होम मिनिस्टर”या कार्यक्रमात, पैठणीचा खेळ रंगतदार असतो. गप्पागोष्टी, रंजक खेळ, तसेच हिंदी मराठी गाणी यातून महिलांच्या आनंदाला उधाण येतो. मागील वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमाम बुलढाणेकर महिलांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या अध्यक्षा मालती ताई शेळके यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी आरोग्यदायी भेट मिळणार आहे.
महिलांना निशुक्लपणे या कार्यक्रमात सहभागी होतात.
महिलांना निशुक्लपणे या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. हे विशेष ,पैठणीच्या खेळातील विजेत्यांना आकर्षक बक्षीस मिळणार आहेत. त्यामध्ये फ्रिज, वाशिंग मशीन, एलसीडी अशा आकर्षित पारितोषिकांचा समावेश आहे. त्यासह पाच मानाच्या पैठण्या विजेत्या महिलांना मिळणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने महिलांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मालती शेळके यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button