महाराष्ट्रविदर्भसामाजिक

तेल्हारा शिवसेनेच्या वतीने हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२६ ; तेल्हारा शहरातील टावर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ हिंदूहदय सम्राट ,महाराष्ट्र शिवसेना पक्ष संस्थापक , व्यंगचित्रकार व संपुर्ण राज्यात आपला दबदबा तयार करणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांची
मंगळवार दि.२३ जानेवारी २०२४
रोजी ९८ वी जयंती शिवसेना पक्षा तर्फे साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम तेल्हारा शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व नंतर हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण वैष्णव , शहर प्रमुख अनिकेत ढवळे , निखिल हिवराळे , करण भटकर , रुशभ ठाकुर , शिवा खाडे , शिवराम गिरी , अंकुश खंडारे , पंकज वाडेकर , रंगु मोरे , युवा मोर्चा चे सतिश जयस्वाल , गणेश इंगोले , पंडित शांतीलाल शर्मा , विजय पवार यांच्या सह शिवसेना चे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button