तेल्हारा नगरी झाली राममय !शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन मा.आ.गोपीकीशन बाजोरीया, आ.प्रकाश भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती

स्टार भारत लाइव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी तेल्हारा ;
अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण हे सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले.या निमित्याने यासोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी तेल्हारा शहर राममय होऊन गेली. या पावन पर्वा निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात करिता प्रमुख मा.आमदार गोपीकिशन बाजोरिया व अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशजी भारसाकडे उपस्थित होते.
अयोध्ये तील श्रीरामजन्मभूमी मंदिरात श्रीरामललाजींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा २२ जानेवारी रोजी पार पडला असून त्या पावन पर्वावर तेल्हारा शहरातील टावर चौक येथे 22 तारखेला श्रीराम सेना सकल हिंदू बांधवांच्या वतीने सकाळी पद यात्रा ,सायंकाळी रामलला महाआरती ,सामुहिक हनुमान चालीसा पठण ,रोशनाई तसेच संगितमय भजन गित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या महाआरती करीता शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख मा.आमदार गोपीकीशन बाजोरीया अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे प्रामुख्याने उपस्थित होते
सोमवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वा. शिवाजी शाळा येथुन पदयात्रा काढण्यात आली पद यात्रेचे समारोप शाळा क्रमांक एक येथे करण्यात आले व सायंकाळी ०६:३० ते १०:०० वा.पर्यंत आयोजन होते. तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराज परीसर टावर चौक येथे रामलला महाआरती ,सामुहिक हनुमान चालीसा पठण ,रोशनाई तसेच संगितमय भजन गित प्रसाद वाटपाचा कार्यक्रम श्रीराम सेना सकल हिंदू बांधव तेल्हारा च्या वतीने करण्यात आले.या कार्यक्रमास मा आमदार गोपीकीशन बाजोरीया, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून रामभक्तांचा उत्साह वाढविला, तसेच तेल्हारा शहरातील रामभक्तांना रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी श्रीराम सेना सकल हिंदू बांधवांच्या समिती च्या वतीने मा.आमदार गोपीकीशन बाजोरीया आमदार प्रकाश पाटील भारसाकळे याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तेल्हारा शहरातील सर्व रामभक्त या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.



