खानदेशजळगावा जिल्हा

काँग्रेसचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा कन्येसह भाजपात प्रवेशमुबई दि २४— डॉ. केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यपदी नियुक्तीची घोषणा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, कन्या डॉ. केतकी पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह शेकडो कार्यर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.मुंबई येथील प्रदेश भाजपा कार्यालया हा प्रवेशसोहळा पार पडला. या सोहळ्याला भाजपाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, माजी मंत्री जयकुमार रावल, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेर विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नंदू महाजन यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाची मफलर गळ्यात टाकून डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिला.डॉ. केतकी पाटील यांच्या नियुक्तीची घोषणाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह पदाधिकार्यांचे भाजपात स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की, डॉ. उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. तसेच डॉ. केतकी पाटील यांनी सुरूवातीपासून अंत्योदय हा घटक डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. केतकी पाटील यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button