प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये ब्रह्माबाबा चा स्मृती दिवस विश्व शांती दिवस म्हणून केला साजरा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि. १९ :- तेल्हारा शहरातील प्रसिद्ध प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय येथे विश्वविद्यालयाचे संस्थापक दादा लेखराज उर्फ ब्रह्माबाबा यांची जयंती दि.१८ जानेवारी हा दिवस विश्वशांती दिवस म्हणून ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र तेल्हारा येथे संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने १९ जानेवारीच्या सकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून ब्रह्मा बाबांच्या ईश्वरिय कार्यातील महत्वपूर्ण योगदानाचे स्मरण करण्यात आले. प्रसंगी जाकीर भाई, अरुण अकोटकर, गोपाल बाजोड, सत्यनारायण भाई, बिके प्रमिला, बिके स्नेहल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जाकीर भाई यांनी मनोगत व्यक्त करताना ब्रह्मा बाबांनी स्थापन केलेल्या संस्थेचा विस्तार संपूर्ण विश्वात होऊन सर्वत्र ईश्वरीय संदेश दिल्या जात आहे. भारतीय संस्कृती व आध्यत्मिक वारसा जोपसणारी ब्रह्माकुमारी अग्रगन्य संस्था असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींनी ब्रह्माबाबांच्या लौकिक तथा अलौकिक आयुष्यातील प्रेरणादायी घटनाचा उल्लेख केला त्यांचा त्याग तपस्या सेवाभावी या गुणांची आठवण प्रत्येकाने ठेवून आपली अध्यात्मिक स्थिती निर्माण करावी. ब्रह्माबाबानी तन मन धन या ईश्वरीय कार्यात लावून संपूर्ण स्थिती प्राप्त केली त्यांच्या गुणांचे अनुसरण करून प्रत्येकानी स्व उन्नती साधन्याचे आवाहन प्रमिला दीदींनी केले.स्मुर्ती दीन विश्वशांती दिवस म्हणून साजरा करताना विशष योग तपस्या भट्टीचे आयोजन करून विश्वातील संपूर्ण मनुष्या प्रती शुभभावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज परिवारातील सर्व भाऊ बहिणी उपस्थित होते.



