बुलढाणामहाराष्ट्रमुबईविदर्भ

वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात तिघांचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

जिल्ह्यात संक्रांतीला वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. आज सकाळी 8 वाजता जालना कडून मेहकर कडे जाणारा ट्रक पुलावर पलटी होऊन ड्रायव्हरचा जागेवर मृत्यु झाला. दुसरा अपघात मेहकर रोडवरील आवार शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर शेगाव येथे खामगाव रोडवरी हॉटेल गुरूकृपा समोर ऑटोने धडक दिल्याने एका 55 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सिंदखेडराजातील राहेरी बू या गावालगत आसलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 8 वाजता मकर संक्रातीच्या दिवशी जालना कडून मेहकर कडे जाणारा ट्रक पुलावर पलटी होऊन ड्रायव्हरचा या अपघातात जागेवर मृत्यू झाला आहे. सदर ट्रक रिकाम्या शिश्या घेऊन जात होता. अपघात एवढा मोठा भिषण होता की राहेरीजवळ काही अंतरावर एका लहान पुलांचे कठडे तोडून निघाले. लोखंडी

कठड्याचा तुकडा ड्रायव्हरच्या पोटात घुसला व ड्रायव्हर जागेवरच मरण पावला. या ट्रक ड्रायव्हर हरी ओम शर्मा वय अंदाजे 52 असून हा मध्य प्रदेश मधील लटेरी येथील आहे. ट्रक नंबर R j.,11,GC,1190 हा आहे

सदर अपघाताची माहिताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे व त्याचे सहकारी नाजिम चौधरी, मुंडे, शिवाजी बारगजे, कर्मचारी तात्काळ घटना घटनास्थळी हजर होऊन वाहतूक सुरळीत करून दिली पुढील तपास ठाणेदार

दत्तात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्नाखाली करत आहे. दुसरा अपघात आवार शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना काल रात्री मेहकर रोडवरील आवार नाजीक पडली. आवार येथील अक्षय तुळशीराम सातपुते (23) हा व एक मुलगी हे काल 14 जानेवारीच्या रात्री 9.20 वाजताच्या सुमारास दुचाकी क्र. एमएब 28 बीएन 5323 ने आवार शिवारातील शेतातून येत होते. दरम्यान टोल

नाक्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धड़क दिली. या अपघातात अक्षय सातपुते याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे.

त्यामुळे तिला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने आवार गावात हळहळ व्यक्त होत आहे, याप्रकरणी सागर श्रीराम गावडे याच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम 279,304 (ए),337,427 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका मनोज चव्हाण करीत आहेत. तर तिसरा अपघात शेगाव येथील खामगाव रोडवर हॉटेल गुरूकृपा समोर ऑटोने धड़क दिल्यामुळे अलका अरूण ढगे क्य 55 रा. जगदंबा नगर शेगाव ही महिला गंभीर जखमी झाली. ऑटो चालकाने सदर महिलेला सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button