तेल्हारा तालुका पत्रकार संघाला मिळाला मराठी पत्रकार परिषद मुंबईचा आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार!स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१६ ; मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने दिल्या जाणारा दरवर्षीचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार हा तेल्हारा तालुका पत्रकार संघाला शनिवार दि.१३जानेवारी २०२४ रोजी माहुर येथे प्रदान झाला.
पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी, परिषद म्हणजे ; मराठी पत्रकार परिषद मुंबई. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार पुरस्काराचे वितरण हे आयोजीत मेळाव्यात श्री क्षेत्र माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा ,तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद ठोकणे ,मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकात अली मिर साहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश शिंगणारे, सत्यशील सावरकर, पत्रकार सर्वश्री अनंत अहेरकर ,रामाभाउ फाटकर, सदानंद खारोडे,प्रा. विद्याधर खुमकर, राहुल मिटकरी ,सुरेश सिसोदिया इत्यादींना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख संपूर्ण देशात ओळख असलेल्या प्रसिद्ध अशा वृत्त संस्थेच्या च्या विनया देशपांडे ,नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी , किनवट माहूर विधानसभा आ. भीमराव केराम , भाजपाचे अशोक पाटील सूर्यवंशी शिवसेनेचे ज्योतिबा खराटे ,माजी आ. प्रदीप नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक ,नांदेडचे जी. प. माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, स्वागताध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर आदी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण नाईक यांच्या प्रेरणेतून अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सदर मेळावा व पुरस्कार वितरण उत्कृष्ट व आदर्शवादी व्हावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर सरचिटणीस मन्सूर भाई यांच्यासह नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियानी व कार्यकारणी माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसाने व कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले राज्यस्तरीय पत्रकार मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मध्ये रंग अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दक्षिण नगर जिल्हा, उत्तर नगर जिल्हा यांना तर वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार विभागश: अमरावती विभागात तेल्हारा तालुका पत्रकार संघ जिल्हा अकोला, मराठवाडा विभागात माजलगाव तालुका पत्रकार संघ जि. बीड, लातूर विभागात माहूर तालुका पत्रकार संघ जि. नांदेड ,नाशिक विभागात साक्री तालुका पत्रकार संघ जि. धुळे, पुणे विभागात शिरूर तालुका पत्रकार संघ जि. पुणे, कोल्हापूर विभागात बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ जि. सांगली, नागपूर विभागात आर्णी तालुका पत्रकार संघ जि. वर्धा, कोकण विभागात अंबरनाथ तालुका पत्रकार संघ जि. ठाणे यांचा समावेश आहे सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर राम तरटे यांनी तर आभार विजय जोशी यांनी मानले असून यावेळी असंख्य पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदावर असलेले पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते ✍️



