खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबई

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली शाळेची शैक्षणीक सहल मुंबई दर्शनला रवाना –

दिवा – (सचिन शेलवले ) दिनांक 29/12/2023 रोजी श्री गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा पूर्व या शाळेची शैक्षणिक सहल इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत तसेच माय मदर इंग्लीश स्कुलचे विद्यार्थी असे एकुण ५०० विद्यार्थ्याची व त्यांच्या समवेत शिक्षकांची सकाळी शाळेतून ठिक 7.00 वाजता मुंबई दर्शन करण्यासाठी निघाली . प्रथम संस्थेचे सचिव श्री साईनाथ म्हात्रे व केतकी म्हात्रे यांच्या हस्ते पुजन व त्रीफळ वाढविला . सर्व मुलांनी बसमध्ये गाण्याच्या भेंड्या , गाण्यांवर नाच करत बसेसमध्ये दंगा केला .मुंबई दर्शनामध्ये प्रमुख नेहरु तारांगण, नेहरु सेंटर व राणीचा बाग ही प्रमुख ठिकाणे होती . मुंबईला गेल्यावर मुलांना प्रथम नास्टा दिला त्यानंतर नेहरु तारांगण चा शो दाखविला . तेथे मुलांना ग्रह, तारे, उपग्रह यांची प्रत्यक्ष माहिती अनुभवाला मिळाली . त्यानंतर मुलांनी दुपारचे जेवण करून नेहरु सेंटर बघितले . तिथे अनेक वैज्ञानिक शोध, गणिती तंत्र , विविध ध्वनी निर्माण करणारी यंत्र , अनेक गणिती खेळ प्रत्यक्ष मुलांना अनुभवायला मिळाली . त्यानेतर राणीच्या बागेत मुलांना प्रत्यक्ष हत्ती, वाघ, सिंह, अस्वल, तरस, मगर, कासव, पोपट, पेंग्विन असे अनेक प्राणी व पक्षी प्रत्यक्ष अनुभवास मिळाले . तसेच मुलांनी त्या बागेत विविध खेळांचा आनंद घेतला . सर्व विद्यार्थी असे प्रेक्षणीय स्थळे पाहुन उत्साहीत व आनंदित होती . मुंबई दर्शनासाठी यावर्षी शाळेतून दहा लक्झरी बसेस होत्या . पालकांचे विद्यार्थ्यांना सहलीला पाठवण्याचे प्रोत्साहन मिळाले होते . संध्याकाळी मुलांना नास्ता मिळाला . सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहुन सर्व बसेस दिव्याच्या रस्त्याने रवाना झाल्या . सर्व विद्यार्थी सुखरूप घरे पोहोचली .सर्व पालकांनी शाळेचे ,सहल कमिटीचे ववस्थापक व शिक्षकाचे आभार मानले . दिवसभरातील सुंदर नियोजन शाळेच व्यवस्थापन कमीटीने केले होते . यावर्षीची सहल खुप मजेदार व स्मरणात राहील असे यातुन दिसुन येते आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button