
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
खामगाव ::- आ अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून हिवरखेड सरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपा जाहीर प्रवेश केला.
कोणताही पक्ष भेदभाव न करता ग्रामीण भागात आ.अँड. आकाश फुंडकर यांनी मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात विकास कामे केली. तसेच हिवरखेड गावचा सुद्धा सर्वांगीण विकास केला व अजून अनेक विकास कामे प्रस्तावित केली. विकास कामांचा झपाटा पाहून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आ अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिवरखेड गावचे सरपंच संदीप हटकर, सदस्य गजानन गवई, महादेव शिंगाडे, दादाराव कोळपे राजेश जवंजाळ आदींनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या या सर्वांना पुष्पहार व भाजपाचा दुपट्टा घालून आ अँड आकाश फुंडकर यांनी पक्षप्रवेश करून घेतला. यावेळी माजी प स सदस्य विलास काळे, शांताराम बोथे, राजेंद्र देवचे ,कोंटी सरपंच संजय ठोंबरे, गोपाल फुंडकर, अरुण राऊत, यांच्या सह हिवरखेडचे भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



