महाराष्ट्रराजकीयविदर्भ
तेल्हारा शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने ,भाजपच्या कृत्त्याचा निषेध!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.२२: मागील आठवड्याच्या सुरुवातीला भाजप सरकार कडुन दिल्लीतील संसदेमधील विरोधी पक्षाचे १४६ खासदारांचे दबाव तंत्राचा वापर करून निलंबन करण्यात आले त्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अग्रसेन टावर चौक तेल्हारा येथे घोषणाबाजी करत भाजपच्या या कृत्त्याचा निषेध करण्यात आला.
निषेध करण्यापुर्वी सर्वप्रथम टावरचौक तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हार अर्पण केला यावेळी सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते✍️



