विदर्भ

लाहन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

नांदुरा येथील खेळायला बाहेर जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या ११ वर्षीय मुलीचा मृतदेहच विहिरीत तरंगताना आढळून आल्याची खळबळजनक घटना ८डिसेंबरच्या दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील पोटळी येथे उघडकीस आली.

याबाबत मृतक मुलीचे वडील पांडुरंग विठ्ठल बावस्कार वय ३७ रा. पोटळी यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझी मुलगी कु शुभांगी वय ११ही ७ डिसेंबरच्या संध्याकाळी ५.३० वाजेदरम्यान बाहेर खेळायला जाते असे सांगून घराबाहेर निघून

गेली. मात्र संध्याकाळी बराच वेळ झाल्यानंतर ती घरी न परतल्याने तिचा गावात व इतरत्र शोध घेतला मात्र ती कोठेही मिळून आली नाही ८ डिसेंबर रोजी दुपारी गावातील लोक शुभांगीचा शोध घेत असतांना नदीच्या काठी असलेल्या सरकारी विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

या घटनेने पोटळी गावावर शोककळा पसरली असून याप्रकरणी नांदुरा पोलीसांत कलम १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सखोल तपास पोहेकों काशीराम जाधव हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button