आज रोजी बुलढाणा येथील वन बुलढाणा मिशनच्या जिल्हा संपर्क कार्यालयात येथील भीम नगर, परदेसी पुरा, सोळंकी ले आउट सह हतेडी आणि दहीद येथील शेकडो महिलांनी शाहू परिवाराचे अध्यक्ष मा. श्री संदीप दादा शेळके यांच्यासमोर आपल्या व्यस्था मांडल्या.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे नंदा विधाटे बुलढाणा
उपस्थित महिलांनी समस्यांच्या या डोंगराचा खच दाखवत संदीप दादा शेळके यांच्याकडे मदतीची याचना केली. यामध्ये घरकुल न मिळणे, सरकारी योजनांचा लाभ न मिळणे, वाढते कर्ज हाताला काम नाही म्हणून वाढत्या महागाईत समस्येच्या विळख्यात घर चालवणे दुरापस्त झाले म्हणत टाहो फोडला.
तदनंतर या समस्या ऐकल्यानंतर संदीप दादा शेळके यांनी, राजश्री शाहू परिवार गेल्या 22 वर्षापासून सामाजिक कार्याची ही नैतिक जबाबदारी अखंडीत घेऊन चालत आहे. धनिक च्या माध्यमातून तब्बल 40 महिलांनी
दोनशे कोटीचे कर्ज वाटप करत महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले. कोणतेही राजकीय पद व सत्ता नसताना, वन बुलढाणा मिशन जिल्हा वासि यांच्या दुःखात नेहमीच अग्रस्थानी असते.
राष्ट्रमाता माॅ. जिजाऊंच्या या पुण्यभूमीत स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सरकार महिलांच्या समस्या सोडू शकले नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संदीप दादा शेळके म्हणाले की, वन बुलढाणा मिशन आणि राजश्री शाहू परिवार महिलांच्या या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल आणि सरकारच्या कटिबद्धतेची जबाबदारी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले.



