शेगांव येथील सईबाई मोटे रुग्णालयाचे लिपिक मंगेश जगन्नाथ जोशी एसीबीच्या जाळ्यात

कर्मचाऱ्यास मागितली होती ४० हजाराची लाच
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । येथील सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपीक मंगेश जगन्नाथ जोशी यास रुग्णालयातील कर्मचान्याकडून ४० हजार रूपयांची लाच घेतांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज दुपारी १.३० वाजता सुमारास घडली.
या घटनेसंदर्भात बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घटनेतील तक्रारदार यांचेकडून आश्वासीत प्रगती योजनेचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करून त्यावर वैद्यकीय अधीक्षक यांची सही घेऊन लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी
सईबाई मोटे रुग्णालय शेगाव येथील आरोपी लोकसेवक मंगेश जगन्नाथ जोशी, कनिष्ठ लिपीक हा ४० हजार रूपये लाचेची मागणी करित असल्याबाबतची तक्रार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक यांच्याकडे केली होती.
त्यानुसार आज २ नोव्हेंबर रोजी लाचमागणीपडताळणी कार्यवाही आयोजित केली असता लोकसेवक मंगेश जगन्नाथ जोशी यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजार रूपये लाच मागणी करून सदर लाच रक्कम लक्रारदार यांच्या नोव्हेंबर महिल्याच्या पगारासोबत बिलाची रक्कम जमा झाल्यानंतर स्वीकारणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांचा
नोव्हेंबर महिन्याचा पगार झाल्याने आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन बोलावल्याने आज ७ डिसेंबर रोजी सापळा कारवाई आयोजित केले असता आरोपी लोकसेवक यांस तक्रारदार यांचेकडून ४० हजार रूपये लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन
भविया दरस कारवाई प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई अमरावती अॅन्टी
करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीमती शितल घोगरे, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एएसआय भांगे, पोहेकों प्रविण बैरागी, पोना विनोद लोखंडे, जगदीश पवार, मपोकों स्वाती वाणी, चानापोकों नितीन शेट्ये यांनी पार पाडली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा कार्यालय दुरध्वनी क्र. ०७२६२-२४२५४८ ९६५७०६६४५५ तसेच टोल फ्रि के १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी केले आहे.



