आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
खामगाव : आज दि. ६ डिसेंबर रोजी महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी ६ वाजता आंबेडकरी अनुयायी व माळी समाज बांधव तसेच गुरुदेव सेवा मंडळ इत्यादीच्या संयुक्त अभिवादन केले गेले. गेली कित्येक वर्षींपासून आंबेडकरी अनुयायांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अभिवादन करण्याची प्रथा पाळली जात आहे. याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत सकाळी अभिवादन केले गेले.
यावेळी भारतीय संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यर्यावर प्रा. डॉ. किशोर वानखडे यांनी विशेष प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जनतेला समान न्याय देतांना उपेक्षित वंचित, पिडीत घटकाला माणुसपण बहाल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सर्व लोकलढे स्वाभिमान व न्यायावर आधारित होते. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यामुळे प्रत्येकाला प्राप्त झाला असेही ते म्हणाले. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुरेश सिरसाट, व्ही. एम. भोजने, अॅड. अशोक इंगळे, धोंडीराम खंडारे जेष्ठ नेते,
डी., प्रा. एम. आर. इंगळे, पंजाबराव देशमुख गुरुदेव सेवा मंडळ, अजय तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अतुल सिरसाट, आर. एन वानखडे, अॅड. प्रशांत दाभाडे, आनंद राव वानखडे, प्रल्हाद काका सातव इत्यादीनी आपले विचार मांडले.
अभिवादन कार्यक्रमास अंबादास वानखडे सोशल फोरम अमरावती विभागीय संघटक, रमेश डोंगरे, महादेव राव नाईक, विक्रम नितनवरे, अॅड. पहूरकर, जोगेंद्र हिवराळे, रवी हिवराळे, रमेश हिवराळे, अनिल वाकोडे, विजय बोदडे, राजू खंडारे, अमित तायडे इत्यादी सह असंख्य आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती.



