महाराष्ट्रविदर्भ

प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा कडून तणावमुक्त जीवनासाठी राजयोग अनुभूती शिबिराचे आयोजन..

१० ते १८ डिसेंबर, नऊ दिवशीय शिबीर.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा

तालुका प्रतिनिधी दि.०६: तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दि.१० ते १८ डिसेंबरला नऊ दिवशीय तणावमुक्त जीवन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदोर येथिल राजयोगिनी ब्रह्माकुमारी विद्या दीदी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अध्यात्मिक ज्ञानावर आधारित मार्गदर्शन करणार आहेत.
ब्रह्माकुमारीज, ओम शांती भवन गजानन नगर साई मंदिर रोड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे उदघाट्न १० डिसेंबर रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.तणावमुक्त जीवनशैली व निरोगी आयुष्यासाठी अध्यात्मिक ज्ञान हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. अध्यात्मिक ज्ञानामुळे सकारात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित करता येते.यासंबंधित ब्रह्माकुमारी विद्या दीदीचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे.नऊही दिवस वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.१० डिसेंबर ला उदघाटन कार्यक्रमानंतर “चिंतारहित जीवनशैली”,११डिसेंबर-आयो करे खुशियो से मुलकात”,१२ डिसेंबर-“स्वयं को समझे”,१३डिसेंबर-“गहन ईश्वरीय अनुभूती”१४ डिसेंबर-“सुखी जीवन का रहस्य” १५ डिसेंबर -“राजयोग द्वारा समस्याओ का समाधान”१६ डिसेंबर -“अलौकिकजन्मोत्सव”१७डिसेंबर-“सृष्टीचक्र का रहस्य” १८ डिसेंबर-“गुड बाय टेन्शन”
सहपरिवार सहभागी होऊन आपल्या व आपल्या पारिवारिक जीवनात अमूलाग्र सकारात्मक बदल अनुभव करण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांनी केले आहे. 11 ते 18 डिसेंबर या आठ दिवसात दररोज सकाळी 7:30
ते 9 व सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी सहभागी होऊ शकता.या ताणतणाव मुक्त जीवन अनुभूती शिबिरामुळे हृदयरोग,डायबिटीज, डिप्रेशन इत्यादी रोगापासून बचाव करण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे.तरी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी सह ब्रह्माकुमारीज परिवार तेल्हाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button