तेल्हारा नगरपरिषद मार्फत शहरामध्ये राबवण्यात येत आहे ,स्वच्छ शौचालय अभियान व जनजागृती मोहीम!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा ०५ ;
१७ नोव्हेंबर जागतिक शौचालय (World Toilet Day) दिनानिमित्ताने केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA), भारत सरकार यांचे सुचेने नुसार “स्वच्छ शौचालय अभियान” व जनजागृती मोहीम तेल्हारा शहरात राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने तेल्हारा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतिश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२ डिसेंबर रोजी स्वच्छ शौचालय अभियानाबाबत बस स्टँड परिसर तसेच जिजामाता नगर येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी जिजामाता नगर मधील सुनिता कुटाळे,राधा आवळे,सुनंदा गोमासे,उषा नायसे,कविता हागे,सिता वाघ,राधा वानखडे,नलिनी जहाजगुणे, सुमन गावत्रे,जयश्री जमालपुरे व इतर महिला तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी शहर समन्वयक मंगेश डोरले यांनी सदर अभियानाबाबत महिलांना माहिती दिली.
या अभियानाचे उद्दिष्ट शहरातील सर्व सामुदायिक व सार्वजनिक शौचालय मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे तसेच न.प.हद्दीतील उत्कृष्ट शौचालय नामांकनासाठी पाठवणे हे होय.या करिता शहरातील सर्व नागरिक, खाजगी संस्था, शासकीय व अशासकीय संस्था व कार्यालये, राजकीय व्यक्ती व नागरिक तसेच बचत गट व इतर सामाजिक संघटना यांना याद्वारे सदर अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी जाहिर आवाहन करण्यात येत आहे. सदर अभियानाचा कार्यकाळ दि. १९ नोव्हेंबर, २०२३ (रविवार) (World Toilet Day) जागतिक शौचालय दिवस ते दि. २५ डिसेंबर, २०२३ (Good Governance Day) सुशासन दिवस (सोमवार) पर्यंत आहे, यामध्ये शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती मोहिम आणि सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये FACES (Functional, Accessibility, Clean, Eco-friendly, Safe) या बाबींचा समावेश हा मुख्य उद्देश आहे.




