बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महिलेच्या गळ्यातील पोथ हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांचा पोबारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

शेगांव येथील किरणबाप्पू देशमुख यांची बहिण नेहमी प्रमाणे फिरायला जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांचे गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सुवर्ण मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजेदरम्यान घडली.

यासंदर्भात वृत्त असे की, किरणबाप्पू देशमुख यांची बहिण श्रीमती ज्योती अरुण थोरात ही रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोरील रस्त्यावर फिरत असताना खामगाव शेगाव रोडवरील उत्तमराव देशमुख कॉलेज जवळील रामेश्वर मुक्तीलाल शर्मा याचे घरासमोर असतांना एका दुचाकीवर काळे

शर्ट घातलेले दोन अज्ञात इसम आले व त्यांच्याकडे पाहून पुढे काही अंतरावर जाऊन थांबले. यांनतर मोटर सायकलवर आलेल्या दोन अज्ञात मुलापैकी मागे बसलेल्या एका मुलाने श्रीमती ज्योती थोरात ह्या पुढे जाताच त्यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे वजन ३० ग्रॅम किं. अंदाजे १ लाख ५० हजार रुपये बळजबरीने हिसकावून खामगावकडे मोटर सायकलसह पळुन गेले. याप्रकरणी

किरणबाप्पू देशमुख यांचे रिपोर्टवरुन शहर पोलिसांनी दोघा अनोळखी चोरट्यांविरूध्द अप न ५८५/२०२३ कलम ३९२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि आशिष गद्रे हे करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button