बुलढाणामहाराष्ट्र
माहेरहून ४ लाख आणण्यासाठी

विवाहितेचा पतीकडून छळ
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव माहेरवरून ४ लाख रूपये आणून दे या कारणावरून ३३ वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने, १५ ऑगस्ट ते १४ नोव्हेंरबर पर्यंत तिला मारहाण व शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रास दिला अशी तक्रार दिली.
यावरून पोलिसांनी आरोपी पती वर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत सौ. आशा विष्णु काळे वय ३३ वर्ष रा. सद्गुरु नगर शेगाव यांनी शहर पोस्टेमध्ये फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पती विष्णु गोविंदा काळे ४० वर्ष याचेवर कलम ४९८ (अ), ३२३, ५०४ भादंवि नुसार गुन्हा नोंदवला. अधिक तपास नापोकॉ रवी इंगळे करत आहेत. (ता. प्र)



