गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

14 वर्षीय मुलीला सिगारेटचे चटके देऊन मुलीवर बलात्कार,व मुंडणही केले…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन
अंतर्गत येणाऱ्या २९ वर्षीय युवकाने १४ वर्षीय मुलीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केल्याचा धक्कादायक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार शहरातील कैलास टेकडी परिसरात पडला. आरोपीने पीडितेचे मुंडण देखील केले. या प्रकरणी बंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने खदान पोलिसांना कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध फलमान्वये गुन्हा दाखल करून स्याला अटक केली. गणेश चंद्रशेखर कुंभरे (२९) असे

नराधम आरोपीचे नाव आहे. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीची आरोपी छेड काडायचा. पटिया महिलांनाही तो ठार मारण्याची धमकी देत होता. १५ नोव्हेंबरला पीडितेच्या परात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला सिंधी कॅम्प येथील स्मशानभूमीत नेले व सिगारेटचे चटके दिले. परिसरातील काही मुले मदतीसाठी आल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर आरोपीने दारू पिऊन पीडितेच्या परी तिष्यावर बलात्कार केला. पीडितेला विद्रूप

करण्यासाठी एका सलूनमध्ये नेले व तिचे मुंडण देखील केले. हा सर्व प्रकार पीडितेने आपल्या आई-वडिलांना सांगितला. गरीब कुटुंब व आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिल्याने दोन दिवसापासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. अंधेर वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी महिला अध्यक्ष प्रमा शिरसाट, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हा प्रसिद्धी अटक प्रमुख सचिन शिराळे, जिल्हा

उपाध्यक्ष गजानन दांडगे, गणेश सपकाळ, युवक अध्यक्ष आशीष मांगूळकर, सुनंदा चांदणे यांच्यासह खदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती दिली. यावेळी वंचित पदाधिकारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी गणेश कुंभरेविरुद्ध पोक्सो कायदा कलम ४ व ८ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button