चंद्रपुर मध्ये शाळा वाचवा अभियान

चंद्रपुर – (सचिन शेलवले ) दिनांक १२/११/२ २३ रोजी
चंद्रपूर येथे “शाळा वाचवा अभियान” या विषयाच्या अनुषंगाने राज्यभरातील अनेक संघटना एकत्रित येऊन को-ऑपरेटिव्ह सोसायटी हॉल चंद्रपूर जिल्हा येथे महत्वपूर्ण मिटिंग संपन्न झाली, या मीटिंगमध्ये शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने महत्त्वाची कायदेशीर व जनआंदोलनाची भूमिका विस्तृतपणे मांडण्यात आली, राज्यभरातून आलेल्या संघटनांनी भूमिकेचे स्वागत केले व राज्यातील पाचही विभागांमध्ये (विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र,व कोकण) येथे ताकतीने शिक्षण हक्क परिषदा घेऊन शाळा वाचवण्याचा प्रयत्न एकत्रितपणे केला जाईल अशा पद्धतीचा निर्णय झाला.
व जमलेल्या सर्व संघटनांना एकत्रितपणे मुंबई येथे संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेचे आमंत्रण दिले.

समवेत: शिवश्री ॲड. रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्य), शिवश्री डॉ. राकेश गावतुरे सर शिवश्री डॉ. दीपक जोगदंड सर शिवश्री विजय मुसळे सर शिवश्री विलास डिके सर (रत्नागिरी शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्य) शिवश्री विकी कदम (प्रवक्ते शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्य) शिवश्री गणेश घारे (कर्जत तालुका अध्यक्ष शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्य) व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते




