महाराष्ट्र

रेल्वे भूमी अधिग्रहणातील कवडीमोल मोबदल्या विरोधात अडगांव, हिवरखेड परिसरातील शेतकरी एकवटले!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे.

तेल्हारा/हिवरखेड :- दि ७
भुमी अधिग्रहणात शासनाकडून शेतकऱ्यांना कवडीमोल मोबदला ठरविण्यात आल्याने याचा विरोध करत तालुक्यातील संतप्त शेतकरी एकवटलेले आहे विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अकोट हिवरखेड खंडवा ब्रॉडगेज मार्गाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प अकोट हिवरखेड सोनाळा जामोद तुकईथड या वळण मार्गाने होणार असल्याने नागरिक आणि रेल्वे प्रवाशांमध्ये उत्साह आहे. यासंदर्भात आवश्यक जमिनींचे मोजमाप झाले असून भूमी अधिग्रहणाला वेग आलेला आहे. परंतु सदर भूमी अधिग्रहणात शासनाकडून शेतकऱ्यांना कवडीमोल मोबदला ठरविण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून यासाठी रेल्वे भूमी अधिग्रहण ग्रस्त शेतकरी एकवटले असून कवडीमोल मोबदला मान्य नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे लेखी आक्षेप दाखल केले आहेत. एवढेच नव्हे तर सायब शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असा आर्त टाहो देत शेकडो शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन अन्यायकारक मोबदल्या विरोधात संघर्ष करून चालू बाजार भाव नुसार पाचपट मोबदला मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा वज्र निर्धार केला.
दि.०७-११-२३ मंगळवार रोजी दुपारी अडगांव बु येथे सुभाष ढोकणे,बस स्टैंड समोरील काॅम्प्लेक्स येथे आणि त्यानंतर हिवरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समीती मध्ये रेल्वे भुसंपादन नुकसान भरपाई बाबत शेतकरी जागर मंचचे मा.प्रशांत भाऊ गावंडे, रवीभाऊ पाटील, रेल्वे भूमी अधिग्रहण ग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे राजकुमार भट्टड , सुरेश भाऊ गिर्हे, सुभाष भाऊ ढोकणे यांच्यासह विविध मान्यवरांनी रेल्वे भूमी अधिग्रहण ग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अकोट खंडवा रेल्वे भुसंपादन ग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी अन्यायग्रस्त मोबदल्या विरोधात तीव्र नारेबाजी केली.

बॉक्स

वास्तविक दराच्या तुलनेत शासकीय दरात प्रचंड तफावत
शेतजमिनीचे वास्तविक बाजारभाव अंदाजे 30 ते 40 लक्ष रुपये एकर च्या जवळपास सुरु असून शासकीय रेडी रेकनर दर मात्र दोन ते पाच लाख रुपये एकर प्रमाणेच असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शासनानेच महावितरणसाठी याच परिसरात नऊ वर्षांपूर्वी 18 लक्ष रुपयाच्या वर बाजारभावाने शेत जमीन खरेदी केली तर आता वार्षिक वाढ धरून वास्तविक बाजारभावाच्या पाचपट मोबदला नियमानुसार देण्यात यावा असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. विदर्भ वगळता राज्यातील व देशातील हायवे व रेल्वे अधिग्रहणासाठी वास्तविक बाजारभावाच्या 5 पट मोबदला देण्यात येतो तर मग विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय कशाला? असा सवाल सुद्धा संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया – राजकुमार भट्टड, अध्यक्ष, रेल्वे भुमी अधिग्रहण ग्रस्त शेतकरी संघर्ष समीती.
अकोट हिवरखेड खंडवा रेल्वे मार्गाला विरोध नाही. परंतु शासनानुसार जमिनीचे भाव दोन ते पाच लक्ष रुपये एकर आहेत. त्यानुसार पाचपट मोबदला देण्यात येत आहे. आज रोजी शासनाला 2 ते 5 लक्ष रुपये एकरने जमिनी जिथे भेटत असतील शासनाने तेथून जमिनी घ्यावे. आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात देणार नाही. त्यासाठी सर्व शेतकरी एकवटले असून शासनाला नियमानुसार बाजारभावाच्या 5 पट मोबदला द्यावा लागेल.

प्रशांत गावंडे शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अकोला.-
शासन जुन्या दराने मोबदला देऊन शेतकऱ्यांची बोळवन करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळेपर्यंत आमचा शेतकऱ्यांसह लढा सुरूच राहील.

बळवंत अरखराव, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अकोट.-
शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच रेल्वे भूमि अधिग्रहणाचा मोबदल्या देण्यात येतो. जर कोणाला मोबदला मान्य नसेल तर ते वरिष्ठ स्तरावर अपील करू शकतात. अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अकोट यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button