दळखन येथील जीवनदीप महाविद्यालायामार्फत जि. प. शाळा काष्टी येथील आदिवासी विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

खर्डी – दळखण ( सचिन शेलवले ) शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी दळखन येथील जीवनदीप महाविद्यालयाच्या “राष्ट्रीय सेवा योजना ” विभाग मार्फत जिल्हापरिषद शाळा काष्टी येथील सर्व विद्यार्थ्यांना लाडू,करंजी,चिवडा,चकली,शंकरपाळी,मिठाई,चॉकलेट,बिस्कीट इत्यादी फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले.*
“राष्ट्रीय सेवा योजना” विभागच्या कॉलेज विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या प्रमुख प्राध्यापिका श्रीमती प्रियंका पवार मॅडम तसेच श्रीमती पल्लवी डोंगरे मॅडम याही उपस्थित होत्या.
शाळेतील विद्यार्थ्यांचा “आकाशकंदील बनवण्याचा उपक्रम” शिक्षकांसोबत चालू होता.दिवाळी असल्याने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी आकाशकंदील लावून व फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा केला आणि नंतर फराळाचा स्वाद घेतला.
फटाके फोडल्यानंतर आणि फराळ खाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या सुंदर छटा उमटलेल्या दिसून येत होत्या.
सदर फराळ वाटप कार्यक्रमाला जीवनदीप कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती प्रियंका पवार मॅडम,श्रीमती पल्लवी डोंगरे मॅडम,कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थीवर्ग,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन सारंगधर सर,सहशिक्षक श्री.धनंजय आंधोरीकर सर तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्षा व अंगणवाडी शिक्षिका श्रीमती कल्पनाताई पानगा आदी उपस्थित होते.



