कृ.उ.बा.समिती निवडूनकिचा सोनाळा येथुन प्रचाराचा शुभारंभ..!

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
संग्रामपूर/ शेतकरी महाविकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांनी दि.८ नोव्हेंबर रोजी.श्री संत सोनाजी 
महाराज सोनाळा मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला व धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी महाराजांचे दर्शन घेऊन बाजार समितीचा विकास व शेतकऱ्यांच्या हितासाठी नागरिकांसाठी एक रुपयात पोटभर जेवण, हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी होणार नाही याची पक्की हमी, अनेक वर्षापासून बंद असलेले सोनाळा व पातुर्डा यार्डमध्ये धान्य खरेदी सुरू करण्यात येणार, शेतकऱ्यांचा शेतीमाल साठवणूक करण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था, वरवट बकाल बाजार समितीच्या आवारात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र आर ओ प्लांट उभारणार, तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता सुसज्ज पुस्तकालय सुरू करण्यात येईल, गुरांच्या बाजाराचे सौंदर्यीकरण व पिण्याच्या पाण्याचा जलसाठा इत्यादी सुविधा उभारण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचा विश्वास यावेळी उमेदवारांनी बोलतांना दिला. श्री संत सोनाजी महाराजांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उबाठा गट ) वंचित बहुजन आघाडी, व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित येत भ्रष्टाचार मुक्त बाजार समिती करण्यासाठी वज्रमूठ केली आहे. यावेळी शेतकरी महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार मोहन रामराव खंडेराव, रविंद्र सत्यविजय झाडोकार, श्रीकृष्ण विश्वनाथ तराळे, मनोज निळकंठ देशमुख, बळीराम श्रीराम धुळे, श्रीकांत दादाराव मारोडे, गजानन गणपत राऊत, वत्सलाबाई समाधान गाळकर, कुसुमबाई देवलाल वखारे, शिवहरी दामोदर खोंड, तेजराव विनायकराव बोरसे, अभयसिंह मनोहर मारोडे, प्रविन मनोहर मोरखडे, अजय संजय ठाकरे, राजेंद्र रामभाऊ वानखडे, वीरेंद्र विश्वनाथ झाडोकार, शेख सलीम शेख मोहिबुलहक, वाशिम सलीम खान यांच्या सह राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस, शिवसेना ऊ.बा.ठा,वंचित बहुजन आघाडी,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्व जेष्ठ नेते,कार्ककर्ते व बहुसंख्य मतदार उपस्थित होते.













