महाराष्ट्रविदर्भ

विधानसभा निवडणुकीत मोदीत्यादींची फटारली

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

देशात 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
यामध्ये “मिझोराम” या राज्यात सुध्दा निवडणूक होत आहे.
आश्चर्य वाटते की, बाकीच्या राज्यात (राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा) भाजपने पुरजोरसे प्रचारात आघाडी घेतली, पण मिझोराम राज्यात प्रचारासाठी प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आज प्रचार संपण्याच्या दिवसापर्यंत प्रचारासाठी गेले नाहीत. ते बाकींच्या राज्यात मात्र अनेक वेळा प्रचारासाठी गेलेत.
मिझोराम मध्ये न जाण्याचं कारण काय?
कारण हेच की, मणिपूर हे मिझोरामच्या लगतचे राज्य असून तिथे तेव्हा हाहाकार होवूनही प्रधानमंत्री हे उपाय तर सोडाच पण सांत्वनासाठी सुध्दा मणिपूरला गेलेले नाहीत. अजूनही तिथे लोंकावर अत्याचार चालू आहेत. गृहमंत्री यांनी तेथील समस्या सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. उलटपक्षी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की, ते प्रधानमंत्री व गृहमंत्र्यांच्या स्टेजवर सुध्दा जाणार नाही. ते आधीच एनडीए मधून बाहेर पडलेले आहेत.
कर्नाटक राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेसने जी आश्वासने दिली होती ती खैरात म्हणून मोदींनी भलामण केली होती त्याचप्रमाणे तशीच आश्वासनाची खैरात या चार राज्यांच्या निवडणूकीत भाजप का करीत आहे?
भाजप म्हणते की गॅस सिलेंडर 500 रुपयात सरकार आल्यास देउ, मग देशातल्या सर्व राज्यातील सोडा पण आज ज्या-ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे निदान तिथे तरी सिलेंडर 500 रुपयात का नाही? हा त्यांचेवर अन्याय नाही का?
भाजपचे हे सर्व जूमले आहेत.
निवडणूकीतील त्यांचा प्रचार म्हणजे, “गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली” असाच आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button