मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, आता नवरात्रौत्सव काळात दांडियाचे आयोजन करणाऱ्यांना दांडियाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा व सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक असेल!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-व्हि एम घोडे
दि.१२.नवरात्रोत्सवा मध्ये अनेक मंडळं हे संगीतमय दांडिया चे आयोजन करत असतात, या संगीतमय दांडिया मध्ये दांडिया धारक मग्न होऊन खेळत असतात अनेकदा भान हरवून नाचल्याने कित्तेक वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच कोरोनानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे विविध विकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय सहाय्याची तातडीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशा स्वरूपाचे निवेदन संपादक निलेश दवे यांनी दिले होते.दांडिया खेळत असताना कोणताही अनिष्ट प्रकार घडून आरोग्यास हानी होऊ नये म्हणून ही गरज लक्षात घेता मा.मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी उपलब्ध करून द्यावी ,असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.



