देऊळघाटच्या १७ वर्षी अल्पवयीन मुलीवर कोणाची वाईट नजर पडली?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
५ मुली आणि २ मुले असा त्यांचा परिवार… पण दोन वर्षा आधी त्या ७ लेकरांच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले..५ पैकी ४ मुलींचे लग्न झालेले. त्यामुळे एक मुलगी आणि २ मुलांचा सांभाळ वडीलच करायचे.. मात्र आईविना पोरगी झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कुण्या तरी भामट्याची वाईट नजर पडली आणि अनर्थ घडला.. मुलीचे कोणीतरी अपहरण केले, कुणी केले ,कुठे नेले याबद्दल माहितीनसल्याचे मुलीच्या वडिलांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरूत म्हटले आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील ही घटना आहे. पीडित अल्पवियन मुलीचे वडील शेती करतात,२ वर्षा आधी त्यांच्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या ४ मुलींचे लग्न झाले असून लहान्या मुलीचे शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, लहान मुलगी सध्या १७ वर्षे ६ महिन्यांची असल्याची तक्रारीत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे.
९ ऑक्टोंबरला सकाळी मुलीचे वडील आणि दोन्ही भाऊ शेतात गेले होते. मुलगी घरी एकटीच होती. सायंकाळी चार साडेचार च्या सुमारास वडील आणि भाऊ
काम आटोपून घरी परत आले मात्र .यावेळी त्यांना त्यांची मुलगी दिसून आली नाही. गावात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही सापडली नाही. सकाळी ९ वाचता ती दिसली होती पण त्यानंतर ती नाही नाही असे शेजाऱ्यांनी सांगितले. या प्रकारामुळे हैरान झालेल्या वडिलांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली आहे.



