भारतीय बौद्ध महासभा. तालुका शाखा शेगांव

भारतीय बौद्ध महासभा. तालुका शाखा शेगांव
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
ग्रंथ प्रवरणा दिन
दि.29/9/2023 शुक्रवार रोजी येऊलखेड ता. शेगांव येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथपठणाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आद. ईश्वर दाभाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते तर प्रमुख उपस्थितीत भन्ते धम्मदुत, आद. के. के. शेगोकार जिल्हा कोषाध्यक्ष, आद. राजेश पहुरकर तालुका कोषाध्यक्ष, आद, गजानन खंडारे तालुका संघटक, आद, पत्रकार सागर सिरसाठ गोळेगाव, तायडे साहेब कालखेड,हे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद.डी. एन. खंडारे यांनी, तर आभारप्रदर्शन आद. विश्राम सिरसाठ यांनी केले. ग्रंथ वाचक आद. दिक्षाताई खंडेराव व ग्रंथ विश्लेषक आद. विश्राम सिरसाठ. यांना सम्राट अशोक मंडळ व संघमित्रा महिला मंडळ यांच्या कडून सन्मान करण्यात आला. या वेळी बौद्धाचार्य सापुर्डा पहुरकर, माजी सरपंच प्रकाश गवई, राजपाल भारसाकडे ग्रा. सदस्य येऊलखेड तसेच सर्व धम्म उपासक – उपासिक सर्व गावकरी उपस्थित होते.



