खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

फैजपूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणी प्रात्यक्षिक

फैजपूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणी प्रात्यक्षिक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महािद्यालय जळगाव येथील कृषीकन्या यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फैजपूर गावात कृषी कन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी केली. शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो. फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. ए.देशमुख व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button