चिंचोली फाट्यावर विद्यार्थ्यांनी अडवला शेगाव – शिर्डी राष्ट्रीय महामार्ग

चिंचोली फाट्यावर विद्यार्थ्यांनी अडवला शेगाव – शिर्डी राष्ट्रीय महामार्ग
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील चिंचोली फाट्यावर एसटी बस थांबत नसल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज २६ सप्टेंबर रोजी आक्रमकता दाखवून चिंचोली फाट्यावर थेट रास्ता रोको आंदोलन करून समस्येला तोंड फोडले. चिंचोली गावातील विद्यार्थी शेगाव येथील निरनिराळ्या शाळेत शिकत आहेत. त्यामूळे दररोज हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चिंचोली फाट्यावर येऊन थांबतात मात्र एसटी महामंडळाच्या बसेस फाट्यावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आज सकाळी या विद्यार्थ्यांनी आक्रमकता दाखवित एसटी महामंडळ प्रशासनाविरूध्द रोष व्यक्त करित शेगाव-शिर्डी बस चिंचोली फाट्यावर अडवून रास्ता रोको केला



