अपघातमहाराष्ट्रविदर्भ

रेल्वेच्या धडकेने मोटरसायकल स्वार जागीच मृत्यू

रेल्वेच्या धडकेने मोटरसायकल स्वार जागीच मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव रेल्वेचा धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता पुर्वी उघडकीस आली. मृतक दुचाकीस्वार समाधान महादेव नरवाडे(३५) हा जलंब येथील रहिवासी असून शेगाव शहरातील जगदीश ट्रेडिंग कंपनी यांच्या किराणा दुकानात काम करित होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास मृतक दुचाकीस्वार हा रेल्वे रुळालगतच्या छोट्याशा पायवाटेच्या मार्गाने जलंब येथून शेगावकडे दुचाकी चालवित येत होता. वाटेत आळसणा गावासमोर असताना मागून येत असलेल्या रेल्वे गाडीच्या इंजिनचा त्याला धक्का लागला व तो दुचाकीसह बाजूला फेकला गेला. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मर्ग दाखल करून घटना तपासात घेतली आहे.गाव रेल्वेचा धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता पुर्वी उघडकीस आली. मृतक दुचाकीस्वार समाधान महादेव नरवाडे(३५) हा जलंब येथील रहिवासी असून शेगाव शहरातील जगदीश ट्रेडिंग कंपनी यांच्या किराणा दुकानात काम करित होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास मृतक दुचाकीस्वार हा रेल्वे रुळालगतच्या छोट्याशा पायवाटेच्या मार्गाने जलंब येथून शेगावकडे दुचाकी चालवित येत होता. वाटेत आळसणा गावासमोर असताना मागून येत असलेल्या रेल्वे गाडीच्या इंजिनचा त्याला धक्का लागला व तो दुचाकीसह बाजूला फेकला गेला. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मर्ग दाखल करून घटना तपासात घेतली आहे.रेल्वे रूळालगतच्या पायवाटेवरून दुचाकी चालविणे अतिशय धोकादायक आहे. मात्र आळसणा व एकफळ दरम्यान कुरखेड, एकफळ, जलंब येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात नाईलाजास्तव या पायवाटेवरून मार्गक्रमण करावेच लागते. कारण आळसणा सोडल्यानंतर एकफळच्या पुलापर्यंत रस्ता बांधकाम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होत असल्याने या रस्त्याने ये-जा करता येत नाही. त्यामूळे पायदळ चालणाऱ्यांना व दुचाकीधारकांना रेल्वेच्या बाजूच्या पायवाटेचा वापर केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामूळे आळसणा ते एकफळ दरम्यानचा हा १०० मिटर रस्त्याचे बांधकाम तात्काळ करणे गरजेचे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button