आमचा कोतवाल हरवला हो…! दहा वर्षापासून गायब; धोतरा नंद इच्या सरपंचानी केली तक्रार

आमचा कोतवाल हरवला हो…! दहा वर्षापासून गायब; धोतरा नंद इच्या सरपंचानी केली तक्रार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
धोत्रा नंदई येथील कोतवाल गेल्या दहा वर्षापासून गावात आलाच नाही. कोतवाल हरवल्याची तक्रार सरपंच जिजाबाई मुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
धोत्रा नंदईची सरपंच पदाची जबाबदारी जिजाबाई इंदर मुंडे यांच्याकडे 22 डिसेंबर 2022 पासून आली. तेव्हापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात कुठलाही कोतवाल आमच्या गावी शासकीय कार्यक्रमास व अन्य कामकाजासाठी उपस्थित राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2023 ला देऊळगाव राजा तहसीलदार यांनी लेखी पत्र दिले. 21 सप्टेंबर रोजी गावातील कोतवाल च्या आरक्षण सोडतीसाठी हजर राहण्यास कळविले होते. त्यानुसार हजर राहण्याबाबत आम्ही सोडतीसाठी वेळेवर हजर राहिलो. किंवा तहसीलदारांनी सांगितले की, तुमच्या गावाला 2013 पासून बुरुकुल कोतवाल देण्यात आले आहे. त्यामुळे सोडती रद्द करण्यात आली. 2013 पासून कोतवाल दिला तर तो गावात कधीच आला कसा नाही? तू कोण आहे, त्याला कोणीच पाहिले नाही. शासनाने दिलेला कोतवाल केवळ कागदोपत्रीच कार्यरत आहे. त्याचा पगार निघत आहे. वेळेवर कोतवाल आरक्षण रद्द झाले. त्यामुळे सध्या महसूल विभागात चालले तरी काय? असे अनेक प्रश्न सरपंचांनी प्रशासनाला विचारले आहेत.
महसूल प्रशासनाच्या अजब कारभाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



